सिंगापुरचा राजपक्षी

थ्रश हा सिंगापुरचा राजपक्षी आहे. जगभरात थ्रश पक्ष्यांची खुप विविधता आहे. त्याच्या सर्वांगावर निळसर-काळसर छप्पे किंवा टिपकेधारी आहे. त्याचे डोके आणि मानेचा भाग लालसर तपकिरी बनलेला आहे. त्यामुळेच त्याला थ्रश या विशिष्ट नावाने ओळखले जाते. जमिनीवर झाडाझुडपाच्या आडोशाला तो चरत असतो. किडे, अळ्या, गांडुळे, लहान-सहान बोरासारखी फळे हे त्याचे खाद्य असते. इराक सोडला तर अन्य कोणत्याही देशाने दुसऱ्या एखाद्या थ्रशला राजपक्ष्याचा दर्जा दिलेला नाही. सिंगापुर हा त्याचा देश जगाच्या नकाशावर एखाद्या टिपक्याएवढा म्हणजे फक्त ६४६ चौ. कि.मी. चा आहे. मलेशिया आणि सुमात्रा यांच्यामधल्या मलाका समुद्रधुनीत तो वसलेला आहे. तिथली लोकसंख्या जेमतेम ३० लाख आहे. तिथे चिनी, मले, तामीळ आणि इंग्लिश भाषा बोलली जाते...