ऑन लाईन फ्रेंडशिप


 


कल्याण, जि. ठाणे.


मित्र असणे, मैत्री करणे, मैत्रिणीही असणे ही गोष्ट तर खुप चांगली आहे. त्यामुळे एकटेपणाची जाणीव नाहीशी होते. आपण चार चौघांसारखे आहोत याची खात्री होते. आपला आनंद, आपलं दु:ख हे आपलं एकट्याचं न राहता ते शेअर होतं. इतरांना बोलुन दाखवल्याने वाटलं जातं. मग दु:खाची धार कमी होते. ते दु:ख संपवण्याची ताकद मनात तयार होते. मैत्रिच्या मदतीने काही सोपे मार्ग ही सापडतात. तीच गोष्ट आनंदाची. आनंद मनात भावत नाही. तो तोंड बंद करुन ठेवले तरी आनंदाच्या छटा चेहऱ्यावर उमटतात. एक क्षण असा येतो की मनातला आनंद दुसऱ्याला, मित्रांना, आप्तांना शब्दातून सांगावासा वाटतो. आणि सांगितला जातोच. सुख आणि दु:ख, आनंद व दु:ख हे व्यक्त केल्यानेच मन मोकळे होते. आपल्यातल्या आनंदात मित्र-मैत्रिणींना सामावून घेतले तर तो द्विगुणित होतो. मोबाईल, व्हॉटस्अॅप, फेसबुक या सर्व साधनांमुळे मित्रमैत्रिणीची फौज तयार करणे सोपे झाले आहे. घरबसल्या दिवसरात्र फ्रेंडसशी सटरफटर गप्पा करुन आपला स्वत:चा असा गैरसमज झालेला असतो की, आपण फार मोठे आहोत. आपल्याला पाच हजार फ्रेंडस् आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा आणखी कोणी चांगला असेल असं वाटत नाही. पण ही केवळ दर्पोक्ती असते. ज्यांच्याशी सतत चॅट करतो ते खूप चांगले मित्र आहेत असं नसतं. उलट ते चार दिवस दोस्ती करतात पाचव्या दिवशी रिक्वेस्ट फेटाळतात. आपल्या भोवती अनेक मित्र परिवार असेल ते सतत या ना त्या कारणाने संपर्कातही येत असतील. पण त्या सर्व मित्रांच्या गोतावळ्यातला एक तरी सच्चा मित्र आहे असं छातीठोकपणे सांगता येत नाही. मग ही मैत्री की मैत्रीचा देखावा.. मित्रांसोबत गप्पागोष्टी, हसणे-खिदळणे, पाटा करणे, बर्थडे सेलिब्रेट करणे खूप चांगलं वाटत असतं. त्यामुळे ते सर्व अगदी क्लोज, बेस्ट दीपावली विशेषांक २०१९ ९ फ्रेंडस् वाटु लागतात. पण त्याच वेळी आपल्या स्वतःच्या नात्यांचा विसर पडू लागतो. हे सत्य तेव्हाच समजतं जेव्हा आपल्यावर संकट येतं. दु:खाचे क्षण येतात. आपल्याला एकटेपण त्रास देतं. वास्तविक परिस्थिती अशी असते. की असे ओढुन-ताणून जोडलेले मित्र-मैत्रिणी आनंदाच्या प्रसंगी सोबत करतात, फुकटचा पाहुणचार वसुल करतात. पण जेव्हा मैत्रिच्या कसोटीला उतरण्याचे क्षण येतात तेव्हा हे शेकडो हजारो मित्र फोन स्विच ऑफ करुन बसतात. आपल्यापासून दूर पलायन करतात. व्यसने मित्र परीक्षा, शुर परीक्षा रणांगणे भवति विनये भृत्य परीक्षा, दान परीक्षाच दुर्भिक्ष्ये।। मित्राची परीक्षा आपत्कालीन होते. शुराची परीक्षा युध्द भूमीवर होते. नोकराची परीक्षा विनयशीलतेने होते. तर दानशूराची परीक्षा दृष्काळ परिस्थितीत होते. आपल्या नातलगापेक्षा मित्र-मैत्रिणीना महत्व देण्याकडे युवकांचा कल दिसतो. मैत्रेय समजुतदारापणे सांभाळले तर ते हितावहच होते. पण आज आपण अवती- भोवतीच्या कानातळ्या,डोळ्यातल्या चेहऱ्यांनाच आपण मित्र ही उपाधी लावून प्रसंगी स्वत:ची फसगतही करुन घेत आहोत. ___ मृण्मयी पेपरातला लेख वाचत होती. जग आले जवळ, माणसे गेली दूर. असं लेखाचं शीर्षक होतं. तिला ते वाचताना अगदी तंतोतंत पटल होतं. जणू काही तिच्या मनातलचं लेखात नमूद केलेलं होतं. तिची वाचनाची लय बिघडली ती मृदुलाच्या हाक मारण्याने. “मम्मी माझा बर्थ डे आहे परवा. केकची आर्डर देऊ का? कशाला केक. ती पाश्चात्यांची पध्दत आहे. नाही हं मम्मी केक आणायचाच हं. मी तुझं काही ऐकणार नाही. डॅडींनी परमिशन दिलीय. धमाल मस्ती करणार आहोत आम्ही. आम्ही म्हणजे? अग माझे कॉलेजमधले गर्ल,बॉइज फ्रेंडस् ना बोलवू या. तुझा वाढदिवस काय जग जाहिर करायचाय. मी मावशीला फोन करते. माझ्या आईला फोन करते. नको मावशी, आजी असली समोर की सगळ्यानाचं टेंशन येईल. नाच, गाणी, गपा सगळ्यालाच ब्रेक लागेल. अगं मृदुला पण माझी आई आणि बहिण माझी जवळची नातेवाईक मंडळी, त्यांना नाही बोलवायचं? तुला सदिच्छा द्यायला मोटी माणसं नकोत. शेजारच्या शांता काकू, धाटे वहिनी, नंदिता, माझी मैत्रिण अंजली सगळ्यांना येऊ दे. या तुझ्या आनंदात त्यांनाही सामावू दे की. पण आम्ही फक्त फ्रेंडस् जमणार आहोत. नातलग नकोत. नातलग ते नातलगच. माझ्या फ्रेंडस खूप चांगल्या आहेत. मी फक्त त्यानाच बोलवणार. म्हणजे जवळची जन्माची नाती तोडायची आणि हाय, हॅलो करणारे फ्रेंडस जोडायचे काय काण! याचा अर्थ. अगं ते तुझे रिलेटिव्ह आमचा काय संबंध त्यांच्याशी? उगाच त्याने प्रेझेंटस देण्याचा खर्च नको. मृदुला मृण्मयीचं ऐकायला राजी नव्हती. पण मृदुलाचे ते तुझे रिलेटिव्ह आहेत हे वाक्य मनाला काट्यासारखं बोचलं. आता मुलांचं विश्व मुलांपुरतच मर्यादेत आहे का? असं झालं तर काकाकाकी, मामा-मामी, आजी-आजोबा यांच्याशी नव्या तरुणांना संबंध ठेवायचाच नाहीय. आता ते मृदुलाचे नाहीत तर माझे, आमचे नातेवाईक आहेत. हे वास्तव किती भीषण आहे. हे पार्टी पुरते मित्र एखाद्या अडचणीत येतील का मदतीला. हे तर बुडबुडे आहेत. पण त्यांना सांगणार कोण? वाढदिवसाच्या दिवशी जवळ-जवळ पंचवीस मृदुलाचे मित्रमैत्रिणी जमले होते. मृदुलाची मैत्रिण अंजली मात्र आली होती. हे काय मृदुले? तुझी नातेवाईक मंडळी आली नाहीत वाटतं. अगं अंजू मावशी नातलगापेक्षा तुम्ही काय कमी आहात? आणि पाहण्याची सरबराई करणार कोण? त्यांच्या पुढे आम्हाला एकमेकांशी बोलण्याचीही चोरी होणार. दंगा मस्ती करता येणार नाही. मुदलाचं हे परखड बोलणं अंजु मावशीलाही खटकलं. नंतर बरेच अनोळखी चेहरे जमा झाले. ते कोण? कुठले? मुदलाच्या परिचयाचे की अपरिचित मृण्मयीला काहीच बोध होत नव्हता. पण घराच्या दारात उभ्या असलेल्या माणसाला आत या बसा हे एवढं तरी म्हणणं आणि स्वागत करणं हे करावच लागत होतं. मम्मी ही करिष्मा, ही अनघा, हा प्रियेश, हा रघुरामन, ही सायरा मम्मी हे ना माझे सगळे फेसबुकवरचे फ्रेंडस आहेत. त्यानंतर तिच्या कॉलेजातल्या मुला-मुलींचा ग्रुप आला. गोंधळाला परिसीमाच नव्हती. मृण्मयीला आपल्याच घरात परकं वाटत होतं. कारण ओळखीचे स्नेहभावाचे चेहरे नव्हतेच. मृदुलाचे वडिल माधव ते सुध्दा हा अनोळख्यांचा जमाव बघून गांगरले होते. पण कुणी परका आहे, आपण घरात आलेल्यांच स्वागत करणं गृहस्थाश्रमाचं प्रथम कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन दोघेही त्या उत्सवात सामिल झाले होते. त्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. तर मृदुलापुढे काही बोलणं ही या क्षणाला शक्य नव्हतं. मुदलाने केक कापला. मेणबत्या फंकरल्या. सगळ्यांनी हॅपी वर्थ डे टु यू मृदुला गाणं सुरु केलं. टाळ्या वाजवल्या. सनईची सीडी माधवने लावली. मुदला तोंड वाकडं करत म्हणाली, हे काय पप्पा? धिज इज अनशन्ट म्युझिक. पाय आपोआप थिरकले पाहिजेत. अंगात सळसळलं पाहिजे. असं गाणं पायजे. मग सैराट, वैराट धांगडधिंग्याची गाणी लागली. सर्वांनी त्या केकच्या क्रिममध्ये बचावच हात घालुन मृदुलाच्या चेहऱ्यावर ते क्रीम थापलं. शी काय हा घाणेरडापणा! अन्न आहे ते अंजली मृदुलाला हळुच बोलली. चूप बस आपल्या बोलण्याचा उपयोग नाही. समाज नको त्या गोष्टीत दिलचस्पी दाखवतोय. मम्मी, पप्पा हा ध्रुपद माझा फेसबुक फ्रेंड. नमस्कार ग्लॅड टु मीट यू माधवराव म्हणाले. त्याने मृदुलाला केक भरवला. तोच तिच्या तोंडातला उष्टा केक तिने त्याला भरवला. त्याने खाल्लाही. ते बघुन मृण्मयीच्या अंगावर काटा आला. या कसल्या घाणेरड्या प्रथा? घराच्या गच्चीवर भोजन व्यवस्था होती. लगेच सगळे वर धावले. कधी जेवण न मिळाल्यासारखे जेवणावर तुटून पडले. मंडळी इतकं जेवली. काहीनी किती तरी अन्न खाल्लच नाही. प्लेटस् तशाच टेबलावर टाकून मोकळे झाले. मृण्मयी, अंजली, माधवराव यांना जेवणच उरले नाही. ते उपाशीच खाली आले. सगळी गच्ची खरकटं सांडुन खराब झाली होती. मुला-मुलींनी इतकं अन्न वाया घालवलं की आणखी दहा माणसं जेवली असती. तरुणांच्या बेदरकारीचा अनुभव मृणमयी-माधवने घेतला. दोघांनी रात्री गच्ची स्वच्छ केली तोवर सगळे पसार झाले होते. एकानेही मदत केली नाही. समाज कसा आत्मकेंद्रीत बनत चाललाय हे समजल. क्रीमने माखलेले गलिच्छ चेहरे आणि सेल्फी काढणे यातच सर्वाना भुषण वाटत होते. जेवणात कुणाचही लक्ष नव्हत. काही दिवस असेच गेले. मल्हार तिच्या कॉलेजमधला त्याच्याशी तिचं बरेच दिवसापासून अफेर होतं. एकदा मम्मीला क्लासला जाते सांगुन मृदुला घराबाहेर पडली. थोड्याच अंतरावर मल्हार तिची वाट पाहत गाडीला रेलुन उभा होता. आज त्यांना निरव शांत ठिकाणी एकांत हवा होता. त्या ठिकाणी जायचं होतं. दोघेही गाडीवर बसले. मल्हारने गाडी भरधाव सोडली. शहरी वस्ती संपली. जंगलपट्टी सुरु झाली. इतक्यात चार-पाच युवकांनी चारी बाजुने मल्हारच्या गाडीला घेरलं. मल्हार या आकस्मिक हल्याने विथरला. त्याने गाडी थांबवली. त्यातले दोन जण मल्हारला मारहाण करु लागले. मारण्याचे कारण काय? हे ही त्याला कळेना अन्य तिघांनी मृदुलाला घट्ट पकडलं. त्यांची टोळीची ताकद त्यांच्याकडे चाकु, सुरे हे सारं पाहुन मल्हारची बोबडी वळली. तरीही तो जर मदुलाचा जिवलग मित्र असता तर तो पळुन गेला नसता. मृदुला त्याच्या नावाने मोठमोठ्याने ओरडत होती. मल्हार- मल्हार थांब तु मला सोडव. मल्हार तु माझा मित्र आहेस आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. मागे फिर मल्हार... ह्या नंतर मल्हार आला नाही. जे व्हायला नको तेच झालं. ज्याला स्वत:च रक्षण करता आलं नाही तो माझं काय रक्षण करणार? ज्याच्यावर मी पुर्ण विश्वास टाकून जगत होते तो असा निघाला फुसका बार. वास्तकि मैत्री जोडताना हा पुढचा विचार सहसा कुणी करीत नाही. मैत्री करणं कुणाच्या तरी आधाराचे जगणं त्याला आपल म्हणणं, त्याच्यावर अपार प्रेम करणं हा तर मनुष्य प्राण्याचा स्वभाव धर्म आहे. अशी मैत्री घनदाट व्हायला लागली की मित्र-मैत्रिण आपल्या अडीनडीला कामी येईल ही माफक अशाप, निर्व्याज अपेक्षा आपोआपच असे वाटु लागले. पण आपली पारख पार चुकली आपण बया वाईटाचा विचारच केला नाही. कारण तो सदैव प्रेमाच्या, जवळकीच्या गोष्टी करत असे. पण तो अशा भयानक प्रसंगात त्याची मदत अपेक्षित होती. अशा पळपुट्या, नेभळटापासून आता आपल्याला नेहमीच सावध राहयला हवं. तिथुन मल्हारने जे तोंड काळं केलं. त्या क्षणापासून आजवर त्याचा साधी विचारपूस करण्याचा एकही कॉल आला नाही. आता मृदुलाचा ध्रुपदवरचा विश्वास डळमळीत झाला. सगळेच तरुण प्रेमाची झाल पांघरुन असे वागणार असतील तर काय उपयोग? माझी एकटीची नव्हे तर अवघ्या देशातील युवतींची अशीच परवड होत असेल.उघड-उघड विश्वासघात होत असतील. बरं हा एकट्या तरुणीचा फायदा घेऊन तरुणांनी केलेल्या अत्याचाराचा बोभाटा करणं पोलिसात जाणं म्हणजे नसत्या संकटाला आमंत्रण. स्वत:ची शरीर, मनाची चिरफाड आणि बेअब्र चव्हाट्यावर मांडणं. हे ही तसं धोक्याचच. कारण प्रश्न उभा राहतो. तो लग्न ठरवणाच्या बाबतीत. मग आता खरा मित्र वा खरी मैत्रिण कोण? जी अशा वेळी धावून येते. पण समाजाची मुर्दुमकी राहिलीय कुठे? तरुणीकडे स्वच्छ, सालसपणे बघणारा तरुण अथवा तरुणी मिळणं आणि शुभमंगल झालं. तरच ते खरेखरे जीवन साथी होतात. पण हा दैवाचा व्यवहार म्हणता येतो. आपल्याही मनात मल्हार बाबत खूप आशा-आकांक्षा, स्वप्न सारं होतं. पण मृदुलाने हा प्रकार घरी सांगितलाच नव्हता की पोलिसात तक्रार दिली नव्हती. पण त्या तरुणांचा आपण एकटीने काटा काढणं आपल्याला अशक्य आहे. अशा प्रकरणात पोलिससुध्दा अपयशी ठरतात. मग आता राक्षसांची दुनिया झालीय. मृदुलाचं कॉलेज चालु होतं पण ती मनाने विवेक शुन्य झाली होती. विचारांचे पंखचं छाटले गेले होते. प्रत्येक तरुणात ती आता विषारी नजरेनेच पाहत होती. तिला पुन्हा पुन्हा तोच भीषण प्रसंग आठवत होता. काहीच करावसं वाटत नव्हतं. ती अशा परिस्थितीत ग्रॅज्युएट झाली. आता घरात मृण्मयी आणि माधव मृदुलाच्या लग्नाचा विचार करत होते. काही मुलगे घरी येऊन तिला बघुनही गेले. पण म्हणावं तसं तिचं मुलाकडे बघणं नव्हतं. ही गोष्ट आईवडिलांच्या लक्षात आली होती. आणि चांगल्या स्थळांना ती आभाळात काळे ढग वायाने उडून जावेत तशी ती त्या मुलांना सोडून देत होती. आता मृदुला जरा बऱ्यापैकी माणसात आली होती. पण तिला ही जाणीव खूप खोलवर काळजाला जखम करत्येय ती म्हणजे शेवटी जगात कुणी कुणाचं नाही. आपले बलात्कारासारखे, अश्लाघ्य प्रसंग आपले आपण भोगले ना? पण आताच डळमळुन चालणार नाही. आपल्याला कुणावर तरी विश्वास हा ठेवावाच लागेल. पुढील कठीण काळासाठी जोडीदार पाहिजे. ___ मुण्मयी-माधव तिला बोलले तुझा कोणी मित्र आहे का? तु कुणाच्या प्रेमात पडलीस का? तु अशी किती दिवस नकार घंटा वाजवणार? तु लग्नाच्या वयाची मुलगी घरात ठेवून आम्हाला झोप येईल का? तुझ्या नंतर आम्हाला मंजुषाचं लग्न करायचंय. तु जर अस हटुन बसलीस तर आम्ही काय करायचं? तुच साग. याच वादळी चर्चेच्या काळात मृदुलाला फेसबुक वर एक तरुण भेटला. त्याच नाव होतं रंजन त्याने केलेली फ्रेंड रिक्वेस्ट ताबडतोब स्विकारली आणि ऑनलाईन चॅटिंगचा अडाणीपणा सुरु झाला. रात्री बेडरुममध्ये लॅपटॉपवर तासन्तास मृदुला नवा मित्र रंजनशी चॅटिंग करायची. तु राहतेस कुठे? माहिमला. तु कुठे राहतोस? अग मी नोकरी आणि खाजगी व्यवसायाने सारखा बाहेरच असतो. मी एकटाच असतो नागपुरमध्ये. घरचं कोण कोण आहे तुझ्या? पाह्यलं आई-वडिल, लहान भाऊ एक बहिण रुचिता तिचं लग्न झालय. ___ एक दिवस रंजन आणि मृदुलाच्या प्रेमाला रात्र ही कमी पडली. अगदी जन्मपत्रिका, गुण मीलन, दोघांच्या आई-वडिलांचे कसे होकार मिळवायचे वगैरे गोष्टी बोलुन झाल्या. हे ऑनलाईन पार्टनर शोधणे खूप सोपे आहे आज ऑनलाईनमुळे दोघांच्या दीर्घकालीन नाते व आपला आपण पार्टनर निवडल्याने रिजेक्ट होता येत नाही. एकमेकांची मने काही तडजोडी करु शकतात. करिअरसाठी एकमेकाला प्रोत्साहन देतात. किंवा सम व्यावसायिकाशीच नाते जोडता येते. दोन्हीकडे प्रेशर नसतो. पालक, नातलग फक्त टाळी वाजवायला आणि सुग्रास जेवणाला. रंजन बोलतच होता. मुला- मुलीची लग्न करणं प्रत्येक आई-वडिलांच काम असतं. प्रत्येक मुलीच्या आई-बापाची इच्छा एवढीच असते की मुलीला चांगलं घर, नातलग, चांगला नवरा असं उत्तम स्थळ मिळाव अस वाटत असतं. रंजनच बोलण मृदुलाला योग्य वाटत होतं. पण तिच्या मनात आल की आतापर्यंत ऑनलाईन शॉपिंग किती तरी केलं. पण आता ऑनलाईन जोडीदार निवडण्याचं सोपं नाही ते एक आव्हान आहे. रंजन आपण उद्या बोलु या पहाट व्हायला लागलीय गुडमॉनिंग रंजू. मृदुलाच अलिकडच वागणं बदलल होतं. ती पुन्हा हसरी, बोलकी झाली होती. चैत्रात वेलींना पालवी फुटते तशी. रंजन मृदुलाला लग्नाची घाई करील असं वाटत होत. पण तसं घडत नव्हतं. तो इतर विषयच नेटवर घ्यायचा. एक दिवस तो तिला म्हणाला उद्या आपण बाहेर जाणार आहोत. एन्जॉय करायला. आपले फक्त चेहरे इंटरनेटवर दिसतात. पण आपण शरीराने एकमेकांसमोर आलो नाही तू ये. मी खोली बुक केलीय. राहण्याची अलिशान सोय आहे. खूप एन्जॉय करु. भोळी भाबडी मृदुला त्याच्याबरोबर जायला तयार झाली. आईने विचारले आज तर संडे आहे तु ऑफिसची बॅग घेऊन कुठे निघालीस. अग इयर एडिंग आहे ना ,सगळाच स्टाफ येणार आहे. इन्टरनेटवरचे फोटो आणि प्रत्यक्षात माणूस दिसणं हे खूप वेगळं असतं तरी पण मृदुलाने रंजनला ओळखलं आणि रंजनने तिला पाहताच धावत येऊन तिचे दोन्ही हात पकडले. वरच्या मजल्यावर लॉजिंग होतं. मृदुलाचा हात धरुन रंजन तिला बुक केलेल्या खोलीत घेऊन गेला. रुम अतिशय सुंदर होती. बेडवरचे भारी गालिचे, दारापासून बेडपर्यंत जाताना पायाखाली मखमली रुजामे. मंद प्रकाश, खिडकीतून सूर्य-चद्राचे उदयास्त खूपच मनोवेधक होते. खोलीचं श्रीमंती रुप बघुन मृदुला आनंदित झाली. जे कधीच पाह्यलं नव्हत ते बघितल्यावर ती आचंबितही झाली होती. त्या हर्षोत्फुल्ल अवस्थेत रंजनने तिला मिठीत गच्च आवळलं ते कळलच नाही. नंतर सॉफ्ट ड्रिंक्स मागवली मृदुलाला ते सरबत पिता पिताच गुंगी चढली. तिची जीभ बोलण्यासाठी वलेनाशी झाली. सकाळी तिने डोळे उघडले. पण तिला आपण कुठे आहोत. रंजन कुठे गेला. आपल्या देहाला वासनेचा दर्प येतोय. आपण पुर्ण फसलेल्या आहोत. हे सत्य तिला कळले. आणि रडू लागली. खूप रडली. तिच्या हाताच्या धक्क्याने काचेचा चषक खाली पडला आणि फुटला. काचेच्या ठिकया रुमच्या रुजाम्यावर विखुरल्या. ती ते पाहुन मनात म्हणाली माझ सुध्दा असच झालंय त्या ग्लासची आणि माझी अवस्था सारखीच आहे. तो संपला मी ही तशी काही अंशाने संपलेलीच आहे. मी किती भोळसट आहे मला पुरुषाचं अंतरंग शोधताच येत नाही मी सुंदर आहे हा शापच आहे वरदान तर अजिबात नाही तारुण्य फक्त एवढ्यासाठीच असतं का? ते जरी आवश्यक असलं तरी असा अचानक हल्ला होऊ नये. ती रुमच्या बाहेर आली. वेटर दारात सॅल्युट मारत उभा होता. मॅडम ये चिट्टी साबने आपको दी है! आता तिच्यात ती चिट्टी वाचण्याचही त्राण नव्हतं. तिने घरी जाऊन रंजनला फोन क रजनला फान लावला. हलो रजन तु अस का वागलास तु माझा फेसबुक फ्रेंड आहेस ना? तुच मला परवा लग्नाच वचन दिलंस ना? मग हे तिचं बोलणं अडवत रंजनने उत्तर दिलं लग्न आणि तुझ्याशी? काय वेडीविडी झालीस का? मी विवाहित सभ्य पुरुष आहे. आणि वागण्याबद्दल विचारशील तर तुझा सोळा, सतरावा नंबर असेल. हलकट, नालायक माणसा हे तु मला वेशरमपणे आता सांगतोस. थांब मी पोलिसात तक्रार देते. दे खुशाल दे. मी काही केलेलच नाही. गुन्हा केलाच नाही तर शिक्षा कसली? पोलिस क्षिा कसला पालिस काय करणार तुझी उरली सुरली बेअब्रू तरी शिल्लक ठेव. मैत्री ठव. मत्रा वित्री या असल्या फालतु गोष्टी आहेत. यारी इमान सब झुठा है ! मी काहीच मानत नाही. फोन बंद झाला. ___ मैत्री हया सुप्रतिष्टित शब्दाची तिला अक्षरशः किळस आली. मैत्री हे ढोंग आहे. मैत्री हा बहाणा आहे. मैत्री कोणाशी असावी हेच माझ्या सारख्यांना समजत नाही. सारे सुखाचे सोबती आहेत. आपण चारजणाकडून फसलो. नेटमुळे डेथ व्हायची वेळ आली. त्या परवाच्या आलेल्या पोटापुरतं मिळवणारा शमन मध्ये काय वाईट आहे. आईला उद्या होकार कळवून टाकायला सांगू. संकटात कुणीच नसतं.