प्रार्थनेचे महत्व

मनुष्य प्राचीन काळापासून प्रार्थना करीत आला आहे. अडचणींमधून वाचण्यासाठी भीतीपासून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा चालत आली आहे. आम्ही ईश्वराचेच अंश आहोत. ईश्वराने आमच्या ईश्वरत्वाकडे जायच्या वाटचालीत कृपा करावी. मुक्तीचा मार्ग सुलभ व्हावा अशी भावना प्रार्थनेमागे आहे. उदात्त भावनेतून केली जाणारी प्रार्थना ही सर्वश्रेष्ट असते. ईश्वराकडे आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी प्रार्थना करण्यात येते. आपले जीवन आनंदी आणि प्रसन्न बनावे अशी यामागे भावना असते. प्रार्थना केल्याने आत्मबल मिळते. मानसिक शांती मिळते. शुद्ध मनाने आणि एकाग्रतेने केलेली प्रार्थना फलदायी होते. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.