सबका मालिका एक

शिर्डीचे श्री साईबाबा हे कुठल्या जाती किंवा पंथाचे होते हे आजतागायत कुणालाच माहित नाही. ते प्रथम शिर्डीत आले तेव्हा फक्त १६ वर्षाचे होते व फकीराच्या वेषात कडुलिंबाच्या झाडाखाली बरेच दिवस न खाता-पिता ध्यानस्थ बसलेले असायचे. सर्वप्रथम एका भक्ताने त्यांना साई म्हणून नमस्कार केला तेव्हापासून । साईबाबा म्हणून प्रसिध्द झाले. जर कुणी आपल्या मालमत्ता किंवा जमिन जुमल्याबद्दल साईबाबांना सांगत असे तेव्हा ते म्हणायचे


तेरा मेरा, मेरा तेरा क्या करता है ये


तो सब मन का फेरा


है सबका मालिक एक बंदे सबका मालिक एक


ये सब मनका खेला है ।


उसने तो सिर्फ इंसान बनाया


ये सब हमारा घडा धर्म बखेडा है


सबका दाता एक बंदे सबका दाता एक


सवका मालिक एक बंदे सबका मालिक एक


त्यानी म्हणजेच जो सगळ्यांचा मालिक आहे त्यानी फक्त


माणूस निर्माण केला. माणसांनी आपापल्या सोईनुसार ब्राम्हण,


क्षत्रीय, वैश्य आणि क्षुद्र या जाती निर्माण केल्या. शेवटी साईबाबा


म्हणायचे "सबका मालिक एक"


ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र


हे सब हमारा रचाया इमेला है


उसने तो सिर्फ इंसान बनाया


ये सब हमारे मन का मैला है


सबका पालनहारा एक बंदे सबका पालनहारा एक