गरोदरपणात कोणती काळजी घाल

गर्भाशयातील गर्भाच्या वाढीवर मातेच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा परिणाम होत असतो. त्यामुळे गर्भधारणेच्या काळात माता जे वाचते, ऐकते, पाहते त्या गोष्टींचा प्रभाव गर्भावर होत असतो. याकरिताच गर्भधारणेच्या काळात मातेने आपल्या शरीराची व मानसिक संतुलनाची खबरदारी घेणे आवश्यक असते


. या काळात जर स्त्री हिंसात्मक वर्णन असलेली पुस्तके, हिंसात्मक चित्रपट किंवा भयावह चित्रमालिका पाहत असेल तर जन्मणाऱ्या बालकाची मानसिक जडण-घडण ही त्याच प्रकारची होते. व हीच मुले पुढे गुन्हेगार स्वरुपाची तयार होतात. पण जर माता याच काळात शास्त्रीय संगीत ऐकत असेल किंवा महान लोकांची चरित्र किंवा धार्मिक ग्रंथाचे पठण करत असेल तर ती बालके पुढे शांत, मनमिळावू व हुशार होतात. हे अनेक वर्षाच्या संशोधनानंतर सिध्द झाले आहे. मातेच्या शारीरिक व मानसिक अवस्थेचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम हे गर्भावर होत असतात. ही गोष्ट प्राचीन काळी पण ज्ञात होती. हे आपल्या प्राचीन महाभारत या धार्मिक ग्रंथातनपण सचित केली आहे. त्यामध्ये अभिमन्य हा मातेच्या पोटात असतानाच चक्रव्यह भेद कसा करायचा हे शिकतो. पण चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे हे जेव्हा कृष्ण सांगत असतो तेव्हा अभिमन्यूची माता झोपी जाते. त्यामळे अभिमन्यूला ते शिक्षण मिळत नाही. यावरुन एकच गोष्ट सिद्ध होते की माता गर्भावस्थेत जे काही वाचन करते. पाहते ते सर्व वालक आत्मसात करत असतो. दुदैवाने आजच्या यगातल्या माता गर्भावस्थेत दिवसातील बहुसंख्य वेळ दूरदर्शनसमोर बसून हॉरर शो, हिंसाचारयुक्त चित्रपट, अश्लील गाणी ऐकत असतात व साहजिकच त्यांचे दरगामी परिणाम मुलांच्या संस्कारावर तसेच त्यांच्या मानसिक जडणघडणीवर होतात. व हीच मले पढे गंड प्रवत्तीची किंवा विकत होतात. एका संशोधनातन असे सिद्ध झाले आहे की, आठवड्यातून २० तासांपेक्षा जास्त वेळ व्हिडिओ पाहणाऱ्या मातांपैकी ६० टक्के मातांना तिसऱ्या महिन्यात गर्भपात होण्याची शक्यता असते. यावरुनच दूरदर्शनच्या गंभीर दुष्परिणामाची कल्पना येते.